आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former President Of Mexico Visits SRK On The Sets Of Happy New Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: 'हॅप्पी न्यू इअर'च्या सेटवर शाहरुखला भेटायला पोहोचले मॅक्सिकोचे माजी राष्ट्रपती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी मॅक्सिकोचे माजी राष्ट्रपती विसेंट फॉक्स शाहरुख खानच्या 'हॅप्पी न्यू इअर'च्या सेटवर आले होते. विसेंट यांना पाहून शाहरुखला अनंदाचा धक्काच बसला. सिनेमाच्या सेटवर विसेंट पत्नी मार्था फॉक्स आणि मॅक्सिकोचे सध्याचे राजदूत जॅमी नौलार्ट यांच्यासोबत आले होते.
विसेंट पहिल्यांचा हिंदी सिनेमाच्या सेटवर गेले होते आणि ते शाहरुखच्या सिनेमाविषयी खूपच उत्साही दिसत होते.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, फॉक्स यांनी सिनेमाच्या सेटवर भारत भ्रमंतीविषयी आणि स्वत:विषयीच्या काही गोष्टी शेअर केल्या.
माजी राष्ट्रपती विसेंट यांनी शाहरुख खानविषयीही बरेच काही सांगितले, त्यांच्या सांगण्यानुसार, शाहरुखच्या यशाविषयी आणि त्याच्या मनमोकळ्या स्वभावाबद्दल ऐकले होते. आज त्या गोष्टींचा अनुभव आला. त्यांनी बॉलिवूड सिनेमांचे कौतुकदेखील केले.
शाहरुखने विसेंट यांच्यासोबत 'हॅप्पी न्यू इअर' सिनेविषयी आणि कलाकारांविषयी चर्चा केली. त्यावेळी सेटवर उपस्थित असलेली सिनेमाची दिग्दर्शिका फराह खाननेही विसेंट यांची भेट घेतली. तिने आलेल्या पाहूण्यांना सिनेमाच्या सेट बघण्याचाही आग्रह केला. विसेंट आणि आलेल्या पाहूण्यांनी सिनेमाचा एक सीन शुट करतानादेखील बघितला.
शाहरुखचा 'हॅप्पी न्यू इअर' एक अ‍ॅक्शन कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमात शआहरुख व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, बोमन ईराणी, अभिषेक बच्चन आणि सोनु सूदसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 2014मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आण बघा सिनेमाच्या सेटवर आलेल्या पाहूण्यांची काही छायाचित्रे...