आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Release: Look At Photos, 'Ragini MMS 2' Glimpse

Friday Release: छायाचित्रांमध्ये पाहा 'Ragini MMS-2'ची झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सनी लियोन स्टाटर आणि यावर्षीचा बहुप्रतिक्षित 'रागिनी एमएमएस 2' हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. सनी लियोनचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात होते. सिनेमाचे पोस्टर्स आणि ट्रेलर बरेच बोल्ड आहेत. त्यामुळे सिनेमात सनी लियोनने बरेच बोल्ड सीन्स केले असणार, असं दिसतंय.
काय आहे सिनेमाची कहाणी?
'रागिनी एमएमएस' या सिनेमाची कहाणी जिथे संपली होती तेथूनच 'रागिनी एमएमएस 2'च्या कहाणीला सुरुवात होते. 'रागिनी एमएमएस 2' हा 2011मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रागिनी एमएमएस'चा सिक्वेल आहे. हा सिनेमा बालाजी मोशन पिक्चर्स आणि ए.एल.टी एन्टरटेन्मेंट बॅनरखाली तयार झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत.
सिनेमाची कहाणी रागिनी आणि उदय नावाच्या अशा जोडीविषयी आहे, जे एका रिकाम्या घरात सुट्टीचे दिवस घालवण्यासाठी जातात. उदयला रागिनीसोबत वीकेंड साजरा करण्याची इच्छा असते. त्यावेळी उदय घरात रागिनीचा एक एमएमएस बनवतो. तेव्हा तिथे काही विचित्र घटना घडू लागतात. उदय तिथून निघून जातो. त्याने बनवलेला एमएमएस नंतर व्हायरल होतो. त्यानंतर त्याला रागिनीची आठवण येते आणि त्याचा शेवट एका मेंटल हॉस्पिटलमध्ये असताना होतो.
सिनेमातील गाणी रिलीजआधीच हिट...
सिनेमातील 'बेबी डॉल' आणि 'चार बोटल व्होडका' ही दोन गाणी चांगलीच हिट झाली आहेत. 'चार बोटल व्होडका' या गाण्यात सनी लिओन आणि रॅपर हनीसिंह यांना कास्ट करण्यात आले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'रागिनी एमएमएस 2' या सिनेमाची काही निवडक छायाचित्रे...