आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : प्रेमातील अपयशामुळे अमेरिकेत गेल्या अन् मिसेस अंबानी बनल्या...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिल अंबानींची पत्नी टीना अंबानींचा आज वाढदिवस आहे. 11 फेब्रुवारी 1957 रोजी मुंबईत जन्मलेल्या टीना आता 56 वर्षांच्या झाल्या आहेत. लग्नाआधी टीना यांचे आडणाव मुनीम होते, तसेच त्यांनी आपले कॅरिअर एक अभिनेत्री म्हणून सुरु केले होते. तसेच त्यात चांगले यशही मिळवले होते. या काळात आपल्या काही प्रेमसंबंधातील अडचणीमुळे टीना हे सगळे सोडून अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यांच्या आयुष्यात देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती अनिल धीरूभाई अंबानी यांचे येणे बाकी होते.

टीना मुनीमनंतर टीना अंबानी एका उद्योगपतीची पत्नी नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. टीना सध्या समाजसेवा आणि मानवता याच्यासाठी काम करीत आहेत. टीनाने आपले फिल्मी जीवन सोडून उद्योगपती अनिल अंबानीसोबत लग्न केले. आज त्यांचे जीवन संपूर्णपणे बदललेले दिसते. त्या आज अनेक मानव सेवा आणि चॅरिटी चालवत असून रुग्णालय व स्वयंसेवी संस्था चालवत आहेत.
या निमित्ताने आम्ही टीना मुनीम ते टीना अंबानी बनण्याचा जीवनातील प्रवासावर प्रकाशझोत टाकणार आहोत. तर, वाचा टीना मुनीम कशा भेटल्या अनिल अंबानींना, कसे फुलले प्रेम आणि कधी अडकले लग्नबंधनात...