आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fun Loving Clicks Of Abhishek Bachchan, Aishwarya Bachchan

Fun loving clicks : पत्नी ऐश्वर्यावरुन हटतच नाही अभिषेकची नजर, पाहा दोघांचे रोमँटिक क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिषेकची पत्नी ऐश्वर्याने त्याच्यासाठी एक सरप्राइज बर्थडे पार्टीचे आयोजन केले आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉलिवूडमधलं 'सुपर कपल' म्हणून त्यांना ओळखले जाते. 20 एप्रिल 2007 रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले. लग्नाच्या चार वर्षांनी ऐश्वर्याने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आराध्या हे त्यांच्या मुलीचे नाव.
रिअल लाईफमध्ये रोमँटिक असलेल्या या कपलने ऑन स्क्रिनही भरपूर रोमान्स केला आहे. कुछ ना कहो, सरकार राज, गुरु, उमराव जान, ढाई अक्षर प्रेम के या सिनेमांमध्ये हे दोघे एकत्र झळकले. खरं तर खासगील आयुष्यात या दोघांना एकत्र आणण्याचे श्रेय सिनेमांनाच जातं. अनेक जण सांगतात की, बंटी और बबली सिनेमातील कजरारे कजरारे या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांचे सुत जुळले. नंतर 'गुरु' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांनी आपल्या प्रेमसंबंधांवर शिक्कामोर्तब केले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अभिषेक आणि ऐश्वर्याची काही निवडक अशी छायाचित्रे दाखवत आहोत, ज्यामध्ये या दोघांमधील स्ट्राँग बाँडिंग स्पष्ट दिसून येते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अभिषेक आणि ऐश्वर्याचे रोमँटिक क्षण...