आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: पाहा बिग बी यांच्या लाडक्या अभिषेकचा FUNNY अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज 38वा वाढदिवस साजरा करत आहे. दिग्गज अभिनेते अमिताभ आणि प्रसिध्द अभिनेत्री जया बच्चन यांच्या लाडक्या अभिषेकने 2000मध्ये जे.पी. दत्ता यांच्या 'रेफ्यूजी' सिनेमामधून करिअरला सुरूवात केली होती. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर तो 'शरारमत' आणि 'बस इतना सा ख्वाब'मध्ये दिसला होता. परंतु हे सिनेमेसुध्दा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरले होते.
2003मध्ये तो 'मै प्रेम की दीवानी हूं'मध्ये अभिषेकने काम केले, परंतु 2004 हे वर्ष त्याच्यासाठी यश घेऊन आले होते. त्यावर्षी त्याने मणीरत्नम यांच्या 'युवा' आणि संजय गांधी यांच्या 'धूम' या दोन सिनेमांत काम केले आणि या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. 'धूम' सिनेमाने अभिषेकला खूप प्रसिध्दी मिळवून दिली. 'युवा'साठी त्याला फिल्मफेअर उत्कृष्ट सहकलाकार पुरस्कार मिळाला. त्यानंतर अभिषेकला चांगले सिनेमे मिळत गेले.
तो एक चांगला अभिनेता आहे हे सर्वांनाच माहित आहे, परंतु त्याने निर्माता, पाश्वगायक आणि टेलिव्हिजन होस्टच्या रुपातसुध्दा ओळख निर्माण केली आहे. सुनील मनचंदा यांच्यासोबत निर्मात्याच्या रुपात त्याने बनवलेला 'पा' राष्ट्रीय सिनेमा अवॉर्ड्सच्या अंतर्गत एक उत्कृष्ट सिनेमाचा सन्मान प्राप्त केलेला सिनेमा आहे. या सिनेमात अमिताभ यांनी अभिषेकच्या मुलाची भूमिका साकारली होती.
आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिषेकने काही अशाही भूमिका साकारल्या आहेत ज्यांना बघून आपण स्वत:ला हसण्यापासून थांबवू शकत नाही. चला अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त बघूया सिनेमांच्या प्रमोशन दरम्यानचे त्याची काही छायाचित्रे...