आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली होती. या पार्टीत बॉलिवूडचे दोन कट्टर शत्रू सलमान खान आणि शाहरुख खानने सर्वकाही विसरुन एकमेकांची गळाभेट घेतली होती. बॉलिवूडमधील दोन शत्रू तब्बल पाच वर्षांनंतर एकत्र आले आणि सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरले होते.
2008 साली कतरिनाच्या वाढदिवशी शाहरुख आणि सलमान यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये असलेले शत्रुत्व जगजाहिर आहे. इतक्या वर्षांनंतर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र एका ठिकाणी दिसले.
यादरम्यान सोशल नेटवर्किंग साईट्सवर या दोघांची खिल्ली उडवली गेली आहे. तंत्रज्ञानाच्या सहायाने या दोघांची छायाचित्रे मॉर्फ करुन विनोदी पद्धतीने सादर करण्यात आली आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा इंटरनेटवर शाहरुख-सलमानची कशी खिल्ली उडवली जाते...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.