आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gangs Of Wasseypur Film Release Back To Back In Theater

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'गँग्ज ऑफ वासेपूर'चे दोन्ही भाग बॅक टू बॅक दाखवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सिनेमांच्या इतिहासात प्रथमच 'गँग्ज ऑफ वासेपूर' या चित्रपटाचे दोन भाग एकामागोमाग एक पाहण्याची संधी प्रेक्षकांना लाभणार आहे. येत्या 8 ऑगस्टला भारतातील मोठ्या शहरांत काही निवडक थिएटर्समध्ये 'गँग्ज ऑफ वासेपूर'चा बॅक टू बॅक शो आयोजित करण्यात आला आहे.
'गँग्ज ऑफ वासेपूर' चा पहिला भाग 22 जूनला प्रदर्शित झाला आणि त्याला तिकीटबारीवर चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच पडद्यावर आलेल्या दुसर्‍या भागालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे लोकप्रियतेच्या जोरावर आता 'वासेपूर'च्या टीमने दोन्ही भाग एकाच वेळी पुन्हा दाखवून प्रयोग करण्याचे ठरवले आहे.

याआधी 'गॉडफादर' या हॉलीवूडपटाच्या सिरीज एकापाठोपाठ एक दाखवण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. टेलिव्हिजन क्षेत्रात मालिकांचे एपिसोड्स सलग दाखवले गेले, त्यानंतर एकाच दिवशी एखादा लोकप्रिय चित्रपट चॅनलवर दोनदा दाखवले गेले, मात्र भारतीय सिनेमांच्या इतिहासात प्रथमच थिएटरमध्ये असा धाडसी प्रयोग करण्याचा मान 'गँग्ज ऑफ वासेपूर'ला जातो.
15 मिनिटांच्या ब्रेकसह गँग्ज ऑफ वासेपूरचे दोन्ही भाग मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, चंडीगढ, बंगळुरू, हैदराबाद, पुणे अशा महत्वाच्या शहरांमधील थिएटरवर दाखवण्यात येणार आहेत. यातून आता बॉलिवूमध्ये 'बॅक टू बॅक' नवा ट्रेंड सुरू झाला असल्याची चर्चाही चित्रपटसृष्टीत रंगली आहे.
आता तयारी 'गँग्ज ऑफ वासेपूर 2'ची
गँग्ज ऑफ वासेपूर : वीस कोटींच्या चित्रपटाची दोन दिवसात साडेसाह कोटींची कमाई
गँग्ज ऑफ वासेपूर : आठवणीत साठवून ठेवावा
१८ वर्षांपेक्षा कमी असलेल्यांसाठी नाहीय 'गँग्ज ऑफ वासेपूर'