आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GANPATI SPL : जितेंद्र, शिल्पा शेट्टीच्या घरी अशी झाली गणरायाची पूजा, बघा PICS

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता जितेंद्र यांनी आपल्या अभिनयाने 80-90च्या दशकात सिल्व्हर स्क्रिनवर वेगळी छाप सोडली होती. या 'हिम्मतवाला' स्टारला वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. एकेकाळी त्यांचा दबदबा होता, तर आज त्यांची मुलगी एकता कपूर आणि मुलगा तुषार कपूर एन्टरटेन्मेंट जगतात कार्यरत आहे. त्यांची मुलगी एकता यशस्वी निर्माती असून तिला टेलिव्हिजन क्वीन म्हटले जाते.
जितेंद्र आपल्या कुटुंबीयांच्या यशाचे रहस्य त्यांची ईश्वराप्रती असलेली श्रद्धा असल्याचे सांगतात. त्यांच्या कुटुंबात गणपती उत्सव फार महत्त्वाचा असतो.
आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करताना जितेंद्र म्हणाले, की मी लहान असताना गणपती पेंडॉल सजवण्यासाठी माझ्या मित्रांबरोबर घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायचो. त्या पैशातून आम्ही प्रसाद आणायचो आणि पेंडॉलमध्ये मी प्रसाद वाटायचे काम करायचो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आपल्या घरी गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली.
छायाचित्रांमध्ये बघा जितेंद्र यांच्या घरचा गणपती, याशिवाय बप्पी लहरी आणि शिल्पा शेट्टी यांच्या घरची गणपती पूजा..