आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री गीता बसराने 31व्या वर्षात केले पदार्पण, बघा तिचा ग्लॅमरस अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आज तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 13 मार्च 1984मध्ये इंग्लंडमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. लंडनमध्ये लहानाची मोठी झालेल्या गीताने मुंबईला आल्यानंतर नमिता कपूरच्या एका अभिनयाच्या शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर तिला मॉडेलिंगचे अनेक ऑफर मिळाले. गीताने तिच्या करिअरची सुरूवात 2006मध्ये दिग्दर्शक आदित्य दत्तच्या 'दिल दिया है' सिनेमामधून केली.
2007मध्ये गीताने इमरान हाश्मीसोबत 'द ट्रेन'मध्ये काम केले. 2013मध्ये 'जिला गाजियाबाद' सिनेमात गीता एका छोट्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर 2014मध्ये 'मिस्टर जो भी करवा लो' सिनेमात गीताने अर्शद वारसी आणि सोहा अली खानसोबत काम केले. या सिनेमासाठी गीताने किक बॉक्सिंग शिकली होती. तसे पाहता गीता तिच्या अभिनयापेक्षा भारतीय क्रिकेटर हरभजन सिंहसोबतच्या अफेअरमुळे जास्त चर्चेत असते. गीताने अनेक फॅशन शोमध्ये रॅम्प वॉकसुध्दा केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या ग्लॅमर गर्लची काही खास छायाचित्रे...