आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Genelia And Riteish Deshmukh Relive Wedding Day At India Bridal Fashion Week

लग्नाच्या दीड वर्षांनी रॅम्पवर अवतरले रितेश-जेनेलिया, ताज्या केल्या आठवणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बृॉलिवूडच्या मोस्ट रोमँटिक कपल्सपैकी एक रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा बुधवारी अ‍ॅम्बे व्हॅली इंडियन फॅशन वीकमध्ये रॅम्पवर अवतरले होते. यावेळी हे दोघेही नवदाम्पत्याच्या रुपात दिसत होते. डिझायनर नीता लुल्लाच्या शोचे रितेश आणि जेनेलिया शोस्टॉपर होते.
या फॅशन वीकच्या निमित्ताने रितेश आणि जेनेलिया तब्बल दीड वर्षांनी एकत्र रॅम्पवर अवतरले होते. रितेश आणि जेनेलियाचे लग्न 4 फेब्रुवारी 2012 रोजी झाले होते. यावेळी जेनेलियाने आपल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा देत सांगितले, की नीता लुल्ला यांनीच त्यांच्या लग्नाचे कपडे डिझाईन केले होते.
या फॅशन वीकमध्ये रॅम्पवर अवतरलेल्या रितेशने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर जेनेलिया फ्यूजन गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या इवेंटची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रितेश आणि जेनेलियाचा रॅम्पवरील जलवा...