आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Genelia D'Souza To Appear In A Cameo In Salman Khan's 'Jai Ho'

सलमानच्या ‘जय हो’ मध्ये दिसणार जेनेलिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न झाल्यापासून सिनेमापासून दूर असलेली जेनेलिया डिसूजा आता सोहेल खानच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या ‘जय हो’ सिनेमाद्वारे कमबॅक करत आहे. तिचा ‘तेरे नाल लव हो गया’ गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. रितेश देशमुखसोबत तिचे लग्नदेखील त्याच महिन्यात झाले होते. सलमानच्या आगामी सिनेमात ती पाहुण्या कलावंतांची भूमिका साकारणार असल्याचे कळते. सिनेमाच्या एका क्रू मेंबरनेदेखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. यात ती सलमानच्या बहिणीच्या रूपात दिसेल. 2006 मध्ये आलेल्या तेलगू ‘स्टालिन’ सिनेमाचा हा चित्रपट रिमेक आहे. मूळ सिनेमात चिरंजीवी नायक होता. 24 जानेवारीला प्रदर्शित होणार्‍या ‘जय हो’ मध्ये तब्बू आणि सुनील शेट्टीदेखील दिसणार आहेत.