आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get Away \'circuit\' Of \'Munnabhai\', Could Be Killed During The Shooting

थोडक्यात बचावला अर्शद वारसी, शुटिंगदरम्यान जीव पडला होता धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार्सना 2014 हे वर्ष फारच अडचणीचे आहे. या वर्षाच्या पहिल्या महिन्यात अनेक स्टार्ससोबत अनेक अपघात झाले आहेत. यापूर्वी 23 जानेवारीला शाहरुख खान त्याच्या 'हॅप्पी न्यू इअर' या आगामी सिनेमाची एका हॉटेलमध्ये शुटिंग करत असताना जखमी झाला होता. आणखी एक बातमी समोर आली आहे, की अर्शद वारसी आणि आमिषा पटेल यांनाही एक अपघाताला समोरे जावे लागले आहे.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, अर्शद वारसीला त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगदरम्यान डोक्याला दुखापत झाली आहे. सिनेमाच्या शॉट्सच्या माहितीनुसार, अर्शदने मागच्या बाजूने उडी मारल्याने त्याचे डोके ट्रॉलीला धडकले, त्यावेळी शॉट्स घेण्यासाठी कॅमेरा ऑन होता. सुत्रांनी असेही सांगितले, की त्याचे डोके ट्रॉलीला धडकल्यानंतर जवळपास 30 मिनीट त्याला चक्कर येत होती.
बॉलिवूडमध्ये सिनेमांच्या शुटिंग दरम्यान एका आठवड्यात जखमी होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शाहरुखसुध्दा शुटिंगच्यावेळी गंभीर जखमी झाला होता, त्यावेळी त्याच्या खांद्याचे हाड मोडले होते. आता अर्शद वारसीलाही दुखापत झाली आहे आणि अमिषासुध्दा जखमी झाल्याची बातमी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अर्शद कसा झाला गंभीर जखमी आणि कशी झाली अमिषासोबत कसा घडला अपघात...?