आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: बॉलिवूड इवेंट्मध्ये सनी अवतरते ग्लॅमरस अंदाजात, पाहा 'रागिनी गर्ल'चा जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता कपूरचा बहुचर्चित 'रागिनी एमएमएस 2' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. 2011मध्ये रिलीज झालेल्या 'रागिनी एमएमएस' या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि ए.एल.टी एन्टरटेन्मेंट बॅनरमध्ये तयार झालेला हा सिनेमा भूषण पटेल यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमातील दोन गाणी सध्या बरीच गाजत आहेत.
'बेबी डॉल' आणि 'चार बोतला व्होडका' या गाण्यात सनीचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळतोय. सिनेमात सनीने बरेच बोल्ड सीन्स दिले आहेत. या सिनेमाचे प्रमोशन सनीने अनेक शहरांमध्ये केले. प्रमोशनवेळी सनीचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळाला. केवळ आपल्या सिनेमाच्या प्रमोशनवेळीच नव्हे तर बॉलिवूड कार्यक्रमांतसुद्धा तिचा दिलखेचक अंदाज बघायला मिळत असतो.
सिनेमा रिलीज होण्याच्या निमित्ताने एक नजर टाकुया बॉलिवूड इवेंट्समधील सनीच्या दिलखेचक अंदाजावर...