आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगजित सिंग यांना गुगलची आदरांजली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गझलसम्राट जगजित सिंग यांची आज 72 वी जयंती आहे. यानिमित्ताने गुगलने डुडलवर दिवंगत जगजित सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. जगातील सर्वश्रेष्ठ सर्च इंजिन म्हणून ओळखल्या जाणा-या गुगलने जगजित सिंग यांचे पेटी वाजवतानाचे कॅरिकेचर त्यांच्या गुगल डुडलवर लावले आहे.

जगजित सिंग यांचे 10 ऑक्टोबर 2011 रोजी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले होते. पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित जगजित सिंग भारतीय शास्त्रीय संगीतातील आग्रा घराण्यातून होते. गझलसम्राट जगजित सिंग यांचा जन्म 8 फेब्रवारी 1941 रोजी राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये झाला होता.

जगजित सिंग यांनी हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, उर्दू अशा विविध भाषेत गायन केले आहे. त्यांच्या
निधनाच्या एक वर्षानंतरही गुगल सर्च ट्रेंडर्समध्ये जगजित सिंग यांचे नाव आघाडीवर आहे. आजही अनेक लोक त्यांच्या आवाजावर फिदा आहेत याची प्रचिती गुगल डुडलवर जगजित सिंग यांना पाहून येत आहे.