आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदाचा जादूटोण्यावर विश्वास !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डान्सिंग स्टार गोविंदा आता एका नव्या रूपात येण्याची तयारी करत आहे. तो लवकरच मोठय़ा पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच तो छोट्या पडद्यावर एक रिअ‍ॅलिटी शोदेखील घेऊन येणार आहे. आपल्या नव्या अवतारासाठी गोविंदाने आपले वजनदेखील कमी केले आहे. त्याबरोबरच त्याने आपल्या ड्रेसिंग स्टाइलमध्ये खूप बदल केला आहे. त्याच्या एका हतात कडे आणि बोटात अंगठी दिसत आहे, तर दुसर्‍या हातात रुद्राक्षाची माळ दिसत आहे. पुनरागमन यशासाठी तर गोविंदा या गंडे दोर्‍याचा वापर करत नाही ना ? असा प्रश्न पडत आहे. कारण काही का असेना हे रूप त्याला शोभून दिसत आहे.