आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govinda\'s Attitude, Ignore The Girl Faints On Stage

स्टेजवर बेशुद्ध पडली मॉडेल, मदत न करता गोविंदा गप्पा मारण्यातच राहिला दंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता गोविंदा अलीकडेच मुंबईत आयोजित एका सौंदर्यस्पर्धेत पोहोचला. प्रमुख पाहुणा म्हणून तो येथे आला होता. येथे गोविंदाची विचित्र वृत्ती बघायला मिळाली.
झालं असं, की गोविंदा जेव्हा भाषण द्यायला स्टेजवर आला, तेव्हा त्याच्यामागे स्पर्धेत सहभागी झालेल्या मॉडेल्स उभ्या होत्या. त्यापैकी एक मॉडेल अचानक बेशुद्ध झाली. मागे उभ्या असलेल्या मॉ़डेल्सनी तिला सांभाळून घेतले. मात्र गोविंदाने तिच्याकडे साधे लक्षही दिले नाही आणि या स्पर्धेच्या सुत्रधाराशी तो बोलण्यात आणि आपली स्पीच देण्यात बिझी राहिला.
आता याला त्याचा अॅटिड्युड म्हणावा, स्पीचविषयी असलेले डेडिकेशन म्हणावे, की महिलांविषयीचा अनादर, हे छायाचित्र पाहून तुम्हीच ठरवा.
हा व्हिडिओ एका खासगी वृत्तवाहिनीने जारी केला आहे. या कार्यक्रमाला जुही चावलासुद्धा हजर होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मुंबईत आयोजित ब्युटी कॉन्टेस्टची खास छायाचित्रे...