आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत 'ग्रॅण्ड मस्ती'मधील 6 डर्टी DIALOGUES, ज्यामुळे निर्माण झाला वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक'क्या सुपर कूल हैं हम' या अ‍ॅडल्ट आणि द्विअर्थी संवाद असलेल्या सिनेमानंतर आता पुन्हा एकदा असाच एक सिनेमा या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा सिनेमा म्हणजे 'मस्ती'चा बहुचर्चित सिक्वेल 'ग्रॅण्ड मस्ती' आहे.
मात्र प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमाला मोठा झटका बसला आहे. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये ग्रॅण्ड मस्तीच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालायने हा निर्णय दिला आहे.

सिनेमात अश्लील संवाद असल्यामुळे प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका दिनेश शर्मा यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.

विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदसानी आणि मंजिरी फडणीस, सोनाली कुलकर्णी यांची भूमिका असलेला हा सिनेमा 2004 मध्ये आलेल्या ‘मस्ती’चा सिक्वेल आहे. येत्या शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

त्याचबरोबर या सिनेमाला दिलेल्या सर्टिफिकेटवर सेन्सॉर बोर्डाने पुन्हा विचार करुन आदेश देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या ग्रॅण्ड मस्तीमधील कोणत्या संवादांमुळे वाद निर्माण झाला आहे...