आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकाखोरांची तोंडे गप्प करत मस्तीची 70 कोटी ग्रँड कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीकाखोरांची तोंडे गप्प करत मस्तीची 70 कोटी ग्रँड कमाई
वृत्तसंस्था । मुंबई
द्विअर्थी विनोद, आक्षेपार्ह हावभाव आणि अर्वाच्य संवादांमुळे समीक्षकांनी झोडपून काढल्यानंतरही ‘ग्रँड मस्ती’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटाने केवळ आठ दिवसांत 70 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये दाखल होईल, असे जाणकारांचे मत आहे.

दिग्दर्शक इंद्रकुमार यांनी 2004 मध्ये रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबरॉय यांना घेऊन ‘मस्ती’ हा चित्रपट केला होता. त्यावेळी नर्मविनोद आणि चांगल्या गाण्यांमुळे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दोन वर्षांपूर्वी कुमार यांनी पुन्हा सिक्वेलची घोषणा केली होती. यात तिन्ही अभिनेत्यांना कायम ठेवण्यात आले. मात्र, अभिनेत्रींच्या संख्येत वाढ करून यात तब्बल सहा जणींना घेण्यात आले. सोनाली कुलकर्णी, मंजिरी फडणीस, करिश्मा ताना, मरियम झकेरिया, ब्रुना अल्लाद्दीन, किनत अरोरा यांना चित्रपटात साइन करण्यात आले. 13 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदश्रित झाला. त्यानंतर चित्रपटावर अनेक समीक्षकांनी चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र, प्रेक्षकांनी या चित्रपटाला घेतले. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 66 कोटींचा व्यवसाय केला, तर शनिवारी यात आणखी 4 कोटींची भर टाकत हा आकडा 70 कोटींच्या घरात जाऊन पोहोचला. येणार्‍या काही दिवसांत ‘ग्रँड मस्ती’ 100 कोटींचा आकडा पार करेल, अशी माहिती वितरकांनी दिली.


मस्ती जीवावर बेतली
वसई येथील मंगेश भोंगळ प्रेयसीसोबत ग्रँड मस्ती पाहण्यासाठी शनिवारी मल्टिप्लेक्समध्ये गेला होता. चित्रपटातील विनोदांमुळे तो जोरजोरात हसत होता. याचवेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मंगेशचा जागीच मृत्यू झाला.