आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gulabi Gang Release Before The Gulab Gang In Cinema Hall

‘गुलाब गँग’च्या आधी \'गुलाबी गँग\' चित्रपटागृहांमध्‍ये झळकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माधुरी दीक्षित आणि जुही चावला अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘गुलाब गँग’ हा महिला अत्याचारासारख्या सामाजिक विषयावरील चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. पण त्याआधीच संपत पाल यांच्या महिला सबलीकरणा-या कार्याचा आढावा घेणारा ‘गुलाबी गँग’ नावाचा माहितीपट 21 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.
सौमिक सेन यांनी गुलाब गँग या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढणा-या महिलांच्या एका समूहाची कथा असलेला हा चित्रपट 7 मार्च रोजी प्रदर्शित होतोय. तर त्याआधी 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणारा गुलाबी गँग हा 96 मिनिटांचा माहितीपट असणार आहे. संपत पाल आणि त्यांच्या ‘गुलाबी गँग’ या संघटनेंवर आधारित हा माहितीपट असेल. भ्रूणहत्या, जातीवादातून अत्याचार आणि भ्रष्टाचार याविरोधात ही महिला संघटना बुंदेलखंड भागात लढा देत आहे. निशिता जैन यांनी माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.