आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बॉबी जासूस’ला गुलशनचा नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय लीला भन्साळी यांच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘रामलीला’ मध्ये भवानीची भूमिका साकारणार्‍या गुलशन देवय्याने ‘बॉबी जासूस’ चित्रपटाला नकार दिला आहे.
दिया मिर्झा आणि साहिल संघाच्या बोर्न फ्री इंटरटेन्मेंटच्या बॅनर खाली बनलेल्या या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत आहे. यात ती हेर बनली आहे. अलीकडेच तिचा या चित्रपटातील भिकारी लूकदेखील समोर आला. या चित्रपटात नकारात्मक भूमिकेसाठी गुलशनशी संपर्क करण्यात आला होता.
याविषयी गुलशन म्हणाला की, दियाने मला ही भूमिका ऑफर केली होती. तिच्या मते गुलशन या भूमिकेमध्ये योग्य बसला असता. मात्र ‘शैतान’, ‘हेट स्टोरी’ आणि ‘रामलीला’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारणार्‍या गुलशनने ही भूमिका करण्यास स्पष्ट नकार दिला. याचे कारण सांगताना तो म्हणाला की, खूप विचार करूनच मी त्या भूमिकेला नकार दिला. खरं तर, भूमिका चांगली होती, मात्र आता त्याच-त्याच भूमिका करायच्या नाहीत. त्यामुळे मी नकार दिला. त्यामुळे बॉबी जासूसच्या नकारात्मक भूमिकेसाठी अर्जुन बावेजाला घेतल्याची चर्चा आहे.