आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL : आले होते हीरो व्हायला, मात्र व्हिलन बनून उडवली अभिनेत्रींची झोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लेखक सिनेमाची पटकथा लिहिताना एकीकडे हीरोची भूमिका दमदार बनवता, तर व्हिलनच्या पात्रालासुद्धा योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतात. व्हिलन असा एक घटक आहे, ज्याच्याविना हिंदी सिनेमाची कल्पनासुद्धा करणे चुकीचे ठरेल.
सध्याच्या काळात व्हिलनच्या पात्रात क्रांतिकारी बदल झाला आहे, त्यांच्या भूमिकेची लांबी कमी करण्यात आली आहे. मात्र 80 आणि 90च्या दशकात खलनायक आणि हीरोला सारखं महत्त्व दिलं जातं होतं.
प्राण, अमरिश पुरी, शक्ति कपूर यांसारख्या खलनायकांनी हिंदी सिनेमांत चांगल्या अविस्मरणीय भूमिका वठवल्या आहेत. या सर्व खलनायकांच्या यादीत अभिनेता गुलशन ग्रोवरच्या नावाचा उल्लेख न करुन कसे चालेल.
हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणा-या गुलशन ग्रोवर यांचा आज (21 सप्टेंबर) वाढदिवस आहे.
चला तर मग जाणून घ्या गुलशन ग्रोवर यांच्याविषयीच्या या काही खास गोष्टी...