आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gunday Priyanka, Ranveer, Arjun Get Naughty On India’S Got Talent

\'इंडियाज गॉट टॅलेंट\'मध्ये पोहोचले \'गुंडे\', पाहा रणवीर, अर्जुन आणि प्रियांकाची धमाल-मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या आगामी 'गुंडे' या सिनेमातील स्टारकास्ट अर्थातच रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी सध्या प्रमोशनचा धडाका लावला आहे. अलीकडेच 'गुंडे'ची ही स्टारकास्ट छोट्या पडद्यावर लवकरच दाखल होणा-या 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर पोहोचली होती. या शोमध्ये तिघांनी केवळ तालच धरला नाही, तर परीक्षकांसह भरपूर धमालमस्ती केली.
सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह यांच्यातील बाँडिंग उत्तम जुळून आली आहे. ती बाँडिंग या शोच्या सेटवर पाहायला मिळाली. यावेळी प्रियांका चोप्राने शोची परीक्षक मलायका अरोरा खानसह स्टेजवर ठुमके लावले.
या शोमध्ये प्रियांकाने ब्लॅक टॉपवर स्टायलिश स्कर्ट परिधान केला होता. तर मलायका पिंक आणि ऑरेंज कलरच्या साडीत दिसली. या शोच्या परीक्षक किरण खेर ड्रेसिंगमध्ये या दोघींना मात देताना दिसल्या. किरण खेर यांनी प्रिंटेड यलो साडीसह कुंदन ज्वेलरी घातली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवरील 'गुंडे' स्टार्सची धमाल...