आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Habit Billion Dollars Clab Make 4 Thousand 956 Money

‘हॉबिट’ बिलियन डॉलर्स क्लबमध्ये 4 हजार 956 कोटी रुपयांची कमाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस- पीटर जॅक्सन यांच्या ‘हॉबिट : अ‍ॅन अनएक्स्पेक्टेड जर्नी ’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी गल्ला कमावला आहे. सोमवारपर्यंत चित्रपटाने 4 हजार 956 कोटी रुपयांची कमाई केल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे मार्चपर्यंत अब्जावधी डॉलर्सच्या क्लबमध्ये जाऊन पोहोचेल, असा विश्वास निर्मात्यांना वाटतो. वॉर्नर ब्रदर्स प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. देशांतर्गत पातळीवर चित्रपटाने 1 हजार 500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला 3 हजार 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मार्चनंतर हा चित्रपट अब्जावधी डॉलर्सच्या क्लबमध्ये सहभागी होईल, अशी आशा निर्मात्यांना आहे.

क्लब मेंबर्स
अब्जावधी डॉलर्सची कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत आतापर्यंत चौदा नावे आहेत. जेम्स कॅमरोन यांच्या ‘टायटॅनिक’ला (1998) क्लबचा पहिला मान मिळाला आहे. त्यानंतर ‘द लॉर्ड ऑ फ द रिंग्ज : रिटर्न ऑ फ द किंग ’ (2003) ‘पायरेट्स ऑ फ द कॅरिबियन : डेड मॅन्स चेस्ट ’ (2006), ‘द डार्क नाइट ’(2008) , ‘अवतार ’ (2009) अशी चित्रपटांची यादी आहे.