आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DAY SPL: ही बालकलाकार झाली फिल्म इंडस्ट्रीतील सेक्सी हीरोईन, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकहंसिका मोटवानी हे तामिळ आणि तेलगू सिनेमांमधील प्रसिद्ध नाव. हंसिकाने आपल्या करिअरची सुरुवात 'कोई मिल गया' या बॉलिवूड सिनेमातून बालकलाकाराच्या रुपात केली होती.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी हंसिकाने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. 'शाका लाका बूम बूम', 'देश में निकला होगा चांद', 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' या मालिकांमध्ये हंसिका झळकली.

9 ऑगस्ट 1991 रोजी मुंबईत जन्मलेल्या हंसिकाने बालपणापासूनच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
'देश में निकला होगा चांद' या मालिकेसाठी तिला स्टार परिवाराच्यावतीने बेस्ट चाईल्ड अवॉर्ड मिळाला होता. तर दाक्षिणात्य सिनेमांत पदार्पण करताच हंसिकाने 'देसमुन्दुरु' या आपल्या पहिल्या तेलगू सिनेमासाठी दाक्षिणात्य फिल्मफेअरचा बेस्ड फिमेल डेब्यू हा पुरस्कार आपल्या नावी केला.

हंसिकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया तिच्या बालपणीपासून ते आत्तापर्यंतच्या खास छायाचित्रांवर...