आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अजुबा\'मध्ये बालकलाकाराच्या रुपात झळकला होता अभिषेक, पहिला सिनेमा ठरला होता फ्लॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज (5 फेब्रुवारी) आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा आहे. अभिषेकने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. 1991मध्ये आलेल्या 'अजुबा' या सिनेमात अभिषेक बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन लीड रोलमध्ये होते. 'अजुबा'द्वारे अमिताभ यांनी अभिषेकला बॉलिवू़डमध्ये एन्ट्री दिली होती.
अभिषेक 2000मध्ये रिलीज झालेल्या 'रेफ्युजी' या सिनेमात प्रथमच हीरोच्या रुपात झळकला होता. या सिनेमात त्याच्यासह करिश्मा कपूरची धाकटी बहीण करीना दिसली होती.
अभिषेक अभिनेत्यासोबतच निर्माता, पार्श्वगायक आणि टेलिव्हिजन होस्टदेखील आहे. 2007 मध्ये अभिषेक माजी जगतसुंदरी ऐश्वर्या रायसह लग्नगाठीत अडकला. अभिषेक आणि ऐश्वर्याला एक मुलगी असून आराध्या हे तिचे नाव आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अभिषेकच्या फिल्मी दुनियेतील प्रवासाविषयी...