आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: बालपणापासून ते आत्तापर्यंत, पाहा आलियाची खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माते महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट हिचा आज (15 मार्च) 21वा वाढदिवस आहे. सध्या बॉलिवूडमध्ये आलियाच्या नावाची बरीच चर्चा आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या मते आलियाशिवाय हायवे सिनेमा बनूच शकला नसता. केवळ सिनेसृष्टीतच नव्हे तर अनेक मॅगझिन कव्हरपेजवरसुद्धा आलियाचा जलवा पाहायला मिळतोय.
आलियाचे फिल्मी करिअर...
1999मध्ये 'संघर्ष' सिनेमात आलिया बालकलाकार म्हणून झळकील होती. या सिनेमात तिने कॅमिओ रोल केला होता. अभिनेत्री म्हणून आलियाचा पहिला सिनेमा 2012मध्ये प्रकाशित झाला. करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमात शनायच्या भूमिकेत ती झळकली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2014मध्ये आलियाचा 'हायवे' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात तिने साकारलेल्या वीरा त्रिपाठीच्या भूमिकेला प्रेक्षकांसह समीक्षकांचीही दाद मिळाली.
आगामी सिनेमे...
केवळ दोनच सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी छाप सोडणा-या आलियाचे यावर्षी दोन सिनेमे रिलीजच्या मार्गावर आहेत.
'2 स्टेट्स' - हा एक रोमँटिक ड्रामा सिनेमा आहे. यात अर्जुन कपूर तिच्यासह मेन लीडमध्ये आहे. चेतन भगत यांच्या गाजलेल्या '2 स्टेटस' या नॉव्हेलवर हा सिनेमा बेतला आहे.
'हम्पटी शर्मा की दुल्हनियां' - आलियाचा हा सिनेमासुद्धा रोमँटिक धाटणीचा आहे. या सिनेमात तिच्यासह वरुण धवन स्क्रिन शेअर करणार आहे. या दोघांनी 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली होती. शशांक खेतान या सिनेमाचे दिग्दर्शक असून करण जोहर निर्माता आहे.
अर्जुन कपूरसह आलियाच्या अफेअरची चर्चा...
आलियाचे अभिनेता अर्जुन कपूरसह सूत जुळल्याच्या बातम्या सध्या ऐकिवात आहेत. मात्र हे दोन्ही स्टार्स या सर्व बातम्यांना अफवा असल्याचे म्हणत आहेत. आम्ही केवळ चांगले मित्र असून आमच्यात मैत्रीपलीकडचे नाते नसल्याचे दोघांचे म्हणणे आहे. '2 स्टेट्स' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे कळते. येत्या 18 एप्रिल रोजी आलिया-अर्जुनचा '2 स्टेट्स' हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आलियाची बालपणापासून ते आत्तापर्यंतची खास छायाचित्रे...