आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL: चमको वाशिंग पावडरच्या \'सेल्सगर्ल\'चा जलवा आजही कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1977मध्ये 'जलियावाला बाग' या सिनेमामधून फिल्मी करिअरला सुरूवात करणा-या अभिनेत्री दीप्ती नवल यांचा आज 56वा वाढदिवस आहे. दीप्ती नवल उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच, परंतु त्या कुशल कवीयत्री, चित्रकार आणि छायाचित्रकारसुध्दा आहेत. याव्यतिरिक्त त्यांना संगीताचीसुध्दा आवड आहे आणि त्या स्वत: काही वाद्य वाजवतात, हे विशेष. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये 'लम्हा-लम्हा' हे पुस्तक प्रसिध्द आहे.
50 वर्षांचे फिल्मी करिअर पूर्ण कराणा-या दीप्ती नवल यांनी 'एक बार फिर', 'हम पांच', 'चश्मे बहाद्दूर', 'अंगूर', 'मिर्च मसाला' आणि 'लीला'सारख्या काही सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसे पाहता, दीप्ती नवल त्यांच्या 'चश्मे बहाद्दूर' सिनेमामधून जास्त प्रसिध्द झाल्या होत्या. या सिनेमातील त्यांचा 'चमको वाशिंग पाउडर'च्या 'सेल्सगर्ल'चा अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे.
'जलियावाला बाग' सिनेमामधून सुरू झालेल्या दीप्ती नवल यांच्या फिल्मी करिअरचा प्रवास आजही सुरू आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'यारियां' सिनेमात दीप्ती यांनी अभिनय केला आहे. जानेवारी 2014मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात दीप्ती यांनी गर्ल्स होस्टेलच्या वॉर्डनची भूमिका साकारली होती. या सिनेमापूर्वी त्या 2013मध्ये 'बीए पास' आणि 'औरंगजेब' सिनेमातसुध्दा दिसल्या होत्या. या वर्षी रिलीज झालेल्या 'महाभारत 3D' या अ‍ॅनिमेटेड सिनेमामधील 'कुंती' पात्राला त्यांचा आवाज देण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा दीप्ती नवल यांची सिनेमांमधील काही आठवणीतली छायाचित्रे...