आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: दिव्याने वर्षभरात केले होते 12 सिनेमे, वयाच्या 19व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. दिवसेंदिवस ही यादीच वाढतच चालली आहे. यापैकी काही अभिनेत्री येथे तग धरुन राहतात, तर काहींवर अभिनयाला रामराम ठोकण्याची वेळ येते. मात्र काही अभिनेत्री आहेत, ज्यांना त्यांच्या अभिनय आणि अंदाजासाठी ओळखले आणि स्मरले जाते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. तिचा आज (25 फेब्रुवारी) 40वा वाढदिवस आहे. आज ती या जगात नाही. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला.
दिव्याने आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. तिचे जास्तीत जास्त सिनेमे हिट ठरले. अल्पावधीतच यशोशिखर गाठणा-या दिव्याने कमी वयातच लग्न केले. मात्र हे लग्न तिचे आयुष्य उद्धवस्त करणारे ठरले.
1992 मध्ये एकुण 12 सिनेमात केला होता अभिनय..
दिव्या भारतीने 1992 मध्ये एकुण 12 सिनेमांत काम केले होते. हा एक रेकॉर्ड होता. आजवर कुणीही दिव्याचा हा रेकॉर्ड मो़डित काढू शकले नाही. दिव्याच्या या 12 सिनेमांपैकी 10 हिंदी आणि 2 तेलगु सिनेमे होते.
दिव्याचे एका वर्षात केलेले 12 सिनेमे
'धर्म क्षेत्रम्' (तेलगु)
‘विश्वात्मा’
‘शोला और शबनम’
‘दिल का क्या कसूर’
‘जान से प्यारा’
‘दीवाना’
‘बलवान’
‘दुश्मन जमाना’
‘दिल आशना है’
‘गीत’
'चित्तामा मोगडु' (तेलगु)
‘दिल ही तो है’
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या दिव्याच्या फिल्मी करिअर आणि आयुष्याविषयी...