आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, गेल्या सहा वर्षांत किती बदलली स्लमडॉग मिलेनियरची 'लतिका'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2008मध्ये रिलीज झालेल्या 'स्लमडॉग मिलेनियर' या सिनेमाला प्रेक्षकांसह समीक्षकांचीही दाद मिळाली होती. ऑस्करवर या सिनेमाने आपली मोहोर उमटवली होती. ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बोएल दिग्दर्शित या सिनेमात लतिका नावाचे एक पात्र होते. ही भूमिका तीन मुलींनी वठवली होती.
लतिकाची बालपणीची भूमिका रुबीना अलीने साकारली होती. तर फ्रिडा पिंटोने तारुण्यातील भूमिका साकारली होती. किशोरवयीन भूमिका तन्वी गणेश लोंकर या मुलीने साकारली होती. तेव्हा तन्वी 13 वर्षांची होती. आता ती 19 वर्षांची झाली असून तिने दाक्षिणात्या सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
गेल्या वर्षी रिलीज झाला सिनेमा...
5 मार्च 1995 रोजी मुंबईत जन्मलेल्या तन्वीने दाक्षिणात्य दिग्दर्शक नगमंची यांच्या 'संथिथें उन्नइ' या सिनेमाद्वारे हिरोईन म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी रिलीज झाला होता. अभिनयासोबतच इंडियन क्लासिकल डान्सचेही धडे तिने गिरवले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा गेल्या सहा वर्षांत किती बदलली 'स्लमडॉग मिलेनियर'ची लतिका...