आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण यांनी 'बॉबी'साठी केवळ 1 रुपये घेतले होते मानधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत बॉलिवूड अभिनेते आणि सुप्रसिध्द खलनायक प्राण यांचा 94वा आज वाढदिवस आहे. आज प्राण या जगात नाहीत परंतु त्यांच्या अनेक आठवणी बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये आहेत.
प्राण यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना काही दिवसांनी हिंदी सिनेमामधील शानदार अभिनयासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.
12 फेब्रुवारी 1920मध्ये जन्मलेले प्राण यांना छायाचित्रकार बनण्याची इच्छा होती, परंतु ते फिल्म इंडस्ट्रीचे एक मोठे खलनायक बनले. प्राण यांनी त्यांच्या भयानक अदांना मोठ्या पडद्यावर अशाप्रकारे प्रदर्शित केले, की लोकांनी स्वत:च्या मुलांचे नाव प्राण ठेवणे बंद केले. गत काळात अनेक नवोदीत स्टार्स सिनेमात येत होते, परंतु खलनायकाची भूमिका फक्त प्राणच करत होते.
प्राण यांनी फक्त खलनायकाच्या भूमिकाच नाही साकारल्या तर त्यांनी 'हॉफ टिकट'सारख्या कॉमेडी सिनेमांतदेखील काम केले होते. 'उपकार' सिनेमात त्यांनी त्यांची एक वेगळी छबी निर्माण केली होती. सिनेमात त्यांनी मंगल चाचाची भूमिका साकारली होती. या सिनेमात काम केल्यानंतर त्यांना खलनायकाच्या व्यतिरिक्त भूमिकांच्या ऑफर आल्या.
मोठ्या पडद्यावर सहा दशक आपल्या अभिनयाने जादू दाखवणा-या प्राण यांचा 12 जुलै 2013मध्ये मृत्यू झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या प्राण यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही रंजक गोष्टी...