आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY: भांडण झाल्यानंतर टीनाला भरपूर गिफ्ट देत होते सुपरस्टार राजेश खन्ना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आणि अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी आज 57वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री म्हणून टीनाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी छबी तयार केली आहे. तिने 13 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये 35पेक्षा जास्त सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. या सिनेमांमध्ये तिचे काही सिनेमा हिट राहिले तर काही फ्लॉप ठरले.
टीनाने 1992मध्ये अनिल अंबानीसोबत लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. टीना सध्या बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी ती सामाजिक कार्य करत आहे.
1978मध्ये फिल्मी करिअरला सुरूवात करणारी टीना मुनीमला देवानंद यांनी बॉलिवूडमध्ये आणले असे सांगितले जाते. देवानंद यांनी त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसमधून अनेक नवीन अभिनेत्रींना लाँच केले होते. त्यामध्ये टीना मुनीमलाही गणले जाते.
तसे टीना सिनेमांमधील कामांपेक्षा तिच्या अफेअरसाठी अधिक चर्चेत राहिली. संजय दत्त, राजेश खन्ना आणि अनिल अंबानी या सारख्या बड्या मंडळीसोबत असलेले तिचे प्रेमसंबंध माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय होते.
राजेश खन्ना आणि टीना यांचे दिर्घकाळ अफेअर असल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगात येत होत्या. कारण राजेश खन्नांविषयी टीना सांगत असे, की दोघांचे भांडण झाल्यानंतर राजेश खन्ना तिला नेहमी काही ना काही भेट वस्तू देत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा टीनाच्या फिल्मी करिअर आणि अफेअरविषयी...