आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy B'day: छायाचित्रांमध्ये पाहा हनी सिंगच्या खासगी आयुष्याची झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंडियन रॅपर यो यो हनी सिंग आज आपला 31वा वाढदिवस साजरा करत आहे. हनी सिंगचे खरे नाव हृदेश सिंग आहे. हनी आज संगीत क्षेत्रातील मोठे नाव आहे. तरुणाईला हनीच्या गाण्यांची भूरळ पडली आहे.
केवळ तरुणाईच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन हेसुद्धा हनीचे मोठे चाहते आहेत. हनी सिंगचे 2011मध्ये लग्न झाले आहे. जेव्हा हनीच्या लग्नाची छायाचित्रे इंटरनेटवर आली होती. मात्र तेव्हा आपले लग्न झाले नसल्याचे हनीने म्हटले होते. ही छायाचित्रे एका फोटोशूटदरम्यान असल्याची त्याने म्हटले होते.
हनी यंदाचा वाढदिवस दुबईत करतोय साजरा...
हनी यंदा आपला वाढदिवस दुबईत साजरा करतोय. येथे त्याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक जंगी पार्टी आयोजित केली आहे. पार्टीत त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.
रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात...
हनीने आपल्या करिअरची सुरुवात रेकॉर्डिंग आर्टिस्टच्या रुपात केली होती. 'शकल पे मत जा' (2011) या सिनेमासाठी हनीने पहिल्यांदा संगीतकार म्हणून काम केले होते. त्यानंतर कॉकटेल या सिनेमातील 'मैं शराबी' या गाण्याद्वारे त्याने पहिल्यांदा हिंदी सिनेमात गायनाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
सर्वात जास्त मानधन घेणारा गायक...
हनी सिंग बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक ठरला आहे. 2012मध्ये त्याने 'कॉकटेल' आणि 'मस्तान' या सिनेमासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल 70 लाख रुपये मानधन घेतले होते.
वादासोबत जवळचे नाते..
हनी सिंगचे नावाभोवती नेहमीच वादाची झालर बघायला मिळते. 2013 या वर्षभरात तो अनेकदा वादात अडकला. 'मैं हूं बलात्कारी' हे गाणे गायल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. त्याच्याविरोधात लखनऊमध्ये खटला दाखल करण्यात आला होता. मात्र लवकरच तो या वादातून बाहेर पडला.
हनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या खासगी आयुष्याची खास छायाचित्रे या पॅकेजमधून दाखवत आहोत...