आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, अखेर अजय-काजोलच्या लग्नात शाहरुख का नव्हता झाला सहभागी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळी शाहरुख खान आणि काजोल यांच्या मैत्रीची चर्चा अगदी सामान्य होती. नव्वदच्या दशकात या दोघांची जोडी पडद्यावरची हिट जोडी म्हणून ओळखली जायची. 'दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे' असो किंवा 'कुछ कुछ होता है', या जोडीने प्रत्येकवेळी आपल्या चाहत्यांची अपेक्षा पूर्ण केली आहे. हे दोघे सिनेमांप्रमाणेच खासगी आयुष्यातही खूप चांगले मित्र होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या काजोलसोबत शाहरुखने हिट सिनेमे दिले, जी त्याची खूप चांगली मैत्रीण होती, तिच्याच लग्नात शाहरुख सहभागी झाला नव्हता. अखेर आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात शाहरुख का हजर नव्हता?, हा प्रश्न उपस्थित होतो.
अजयने पाठवले होते निमंत्रण...
अजय आणि काजोलने शाहरुखला आपल्या लग्नात आमंत्रित केले नव्हते, असे नाही. काजोलने पाठवलेल्या आमंत्रणावर शाहरुख त्याच्या कुटुंबीयांसह तिच्या मेंदी कार्यक्रमात सहभागी झाला होता. मात्र अजयने पाठवलेल्या लग्नाच्या आमंत्रणावर तो लग्नात सहभागी झाला नाही.
वादात अडकायचे नव्हते शाहरुखला...
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामागे एकच कारण होते, ते म्हणजे शाहरुखला कोणत्याही वादात अडकायचे नव्हते. दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे या सिनेमात शाहरुखने काजोलला म्हटलेला डायलॉग 'मैं तुम्हारी शादी में नहीं आउंगा' हा रिअल लाइफमध्ये खरा ठरला
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अजयने पाठवलेल्या आमंत्रणावर शाहरुख का सहभागी झाला नव्हता लग्नात...
(नोट : 24 फेब्रुवारी रोजी काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाच्या वाढदिवस होता. त्यानिमित्त divyamarathi.comची ही खास प्रस्तुती...)