आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harman & Bipasha Have Marriage Plans At The Moment

‘ढिश्क्यांऊ’ फ्लॉप ठरला तरी बिपाशा-हरमन करणार लग्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका चोप्राचा माजी प्रियकर हरमन बावेजा आणि जॉन अब्राहमची माजी प्रेयसी बिपाशा बसू गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हरमनने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये आणि बिपाशाने सोशल साइटवर दोघांच्या संबंधांचा स्वीकार केला आहे. दोघांच्याही कुटुंबीयांनी या संबंधांचे लग्नात रूपांतर करण्याची तयारी सुरू केली आहे.
सूत्रांच्या मते, 28 मार्चला हरमनचा ‘ढिशक्यांऊ’ प्रदर्शित झाल्यानंतर लग्नाच्या तारखेची घोषणा करण्यात येणार आहे. या दोघांच्याही मित्रांमध्ये ही चर्चा रंगली आहे की, विचारपूर्वक निर्णय घेणारी बिपाशा हरमनचा हा चित्रपट अपयशी ठरला, तर ती हे नाते पुढे कायम पुढे चालू ठेवेल काय? खरं तर बिपाशाचे करिअरही ‘क्रिएचर’ या तिच्या आगामी चित्रपटावर अवलंबून आहे.
चित्रपट यशस्वी होवो अथवा न होवो, आमचे नाते कायम राहील, असे वचन बिपाशाने हरमनला दिले आहे. त्यामुळे हरमनने आपल्या मित्रांनाही असे सांगितले की, चित्रपट यशस्वी झाला नाही, तरी आम्ही दोघेही लग्न करणारच.