आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Has Shekhar Suman Mortgaged His House For Adhyayan Suman’S Career?

मुलाच्या करिअरसाठी शेखरने आयुष्यभराची कमाई लावली पणाला, घरसुध्दा ठेवले गहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनयानंतर आता दिग्दर्शकाच्या रुपात स्वत:ला सिध्द करण्यासाठी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करणारा अभिनेता शेखर सुमन त्याचा 'हार्टलेस' या आगामी सिनेमातून त्याचा मुलगा अध्ययनच्या करिअरला टर्निंग पॉइंट देण्याच्या प्रयत्नात आहे. एका दिग्दर्शकाच्या भूमिकेत त्याच 'हार्टलेस' हा पहिला सिनेमा आहे. सांगितले जात आहे, की या सिनेमात त्याने त्याच्या आयुष्यभराची कमाई पणाला लावली आहे. हा सिनेमा 7 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
शेखरच्या कुटुंबीयांच्या संबंधीत एका सुत्राने माध्यमांसमोर या गोष्टीचा खुलासा केला आहे, की शेखरने त्याच्या करिअरमधील आतापर्यंतची सर्व कमाई आणि त्याने आतापर्यंत कमवलेला एक-एक पैसा या सिनेमासाठी लावला आहे. त्याला अध्ययनच्या कमबॅकला यशस्वी बनवायचे आहे. अध्ययन आणि शेखर यांचा हा सिनेमा 'अवेक' या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे. ज्याचे अधिकार खरेदी करण्यासाठी शेखरने 5 कोटी रुपये खर्च केले आहेत.
असेही ऐकण्यात आले आहे, की शेखरने त्याच्या मुलाच्या या सिनेमासाठी घरसुध्दा गहाण ठेवले आहे. ही माहिती दुसरे-तिसरे कुणी नाही तर शेखरच्या मित्राने दिली आहे. शेखरला अशा निर्णयाविषयी विचारले तेव्हा त्याने यासाठी नकार दिला नाही. या
पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सिनेमाविषयीचे काही फॅक्ट्स आणि जाणून घ्या माध्यमांच्या प्रश्नांचे शेखरने काय दिले उत्तर...