आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडकरांनी बघितला सिद्धार्थ-परिणीतीचा 'हंसी तो फंसी' सिनेमा, पाहा स्क्रिनिंगचे PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा 'हंसी तो फंसी' हा सिनेमा आज (7 फेब्रुवारी) रिलीज झाला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या सिनेमात मेन लीडमध्ये आहेत.
हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी म्हणजे 6 फेब्रुवारीला मुंबईत याचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. 45 कोटींचा निर्मिती खर्च असलेल्या या सिनेमात परिणीतीने वेड्या शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. तर सिद्धार्थ तिच्या प्रियकराच्या भूमिकेत आहे.
या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील बरीच मंडळी आली होती. दिग्दर्शक विनील मॅथ्यू, निर्माता करण जोहर, परिणीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह वहिदा रहमान, हेलन, संगीता बिजलानी आणि सलीम खान स्क्रिनिंगमध्ये दिसले. मुंबईतील जुहूस्थित पीव्हीआरमध्ये हे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'हंसी तो फंसी' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगची छायाचित्रे दाखवत आहोत...