आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hassi To Fassi First Day Collection Is Only 3 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिणीतीची स्टार व्हॅल्यू नाही चालली...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण जोहरने निर्माण केलेल्या ‘हंसी तो फंसी’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी 3 कोटी व्यवसाय झाला आहे. यापूर्वी धर्मा प्रोडक्शनचा करीना कपूर स्टारर असलेला आणि नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेला ‘गोरी तेरे प्यार में ’चित्रपट फ्लॉप राहिला. करण जोहरच्या बॅनरला हा मोठा फटका होता. आता 2014 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हंसी तो फंसी ’ हा चित्रपटदेखील त्याच दिशेने चालला आहे. 25 कोटीचा खर्च आलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतातून फक्त 3 कोटीचा व्यवसाय केला आहे. करणला आशा होती की त्याच्या चित्रपटाची नायिका प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणेल मात्र असे झाले नाही.
या चित्रपटाचा व्यवसायावर होणारा परिणाम परिणीतीसाठी चांगला होणार नाही. तिने सुरुवातीच्या काळात एक दोन मोठय़ा चित्रपटांना नकार दिला आहे, तर करणला यावर्षीच्या प्रायोगिक चित्रपटांच्या स्क्रिप्ट आणि प्रॉडक्शनवर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्याच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केले आहे.