आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hema Malini Dharmendra Turn Emotional As Vaibhav Vohra Comes On A Chariot To Marry Ahana Deol

बघा कशी वाजत-गाजत आली अहाना देओलची वरात, सनी-बॉबी बहिणीच्या लग्नात होते गैरहजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची धाकटी कन्या अहाना देओल दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोरासह लग्नगाठीत अडकली. 2 फेब्रुवारीला मुंबईत या दोघांचे थाटात लग्न झाले. अहाना आणि वैभवचे लग्न हे बॉलिवूडमधील सर्वांचे लक्ष वेधून घेणारे लग्न ठरले.
वैभव वोरा वाजत-गाचत वरात घेऊन आला होता. यावेळी हेमामालिनी धर्मेंद्र यांच्यासह वरातीचे स्वागत करण्यासाठी हजर होत्या. रेड आणि सिल्व्हर साडीत हेमामालिनी खूप सुंदर दिसल्या. तर धर्मेंद्र यांनी ब्लॅक कलरच्या सुटवर पिंक कलरचा दुपट्टा घेतला होता. यावेळी अहानाचा चुलत भाऊ अभय देओलसुद्धा वरातीचे स्वागत करताना दिसला. हेमामालिनी यांचे मोठे जावईबापूसुद्धा वरातीच्या स्वागतासाठी हजर होते. तर दुसरीकडे ईशाच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने ती वरातीचे स्वागत करण्यासाठी आली नव्हती.
वैभव वरात घेऊन आलेला पाहून धर्मेंद्र आणि हेमामालिनी भावूक झालेले दिसत होते. ईशाच्या लग्नाप्रमाणेच सनी आणि बॉबी देओल यांनी अहानाच्या लग्नातही अनुपस्थिती लावली होती. सनी आणि बॉबी अहानाचे सावत्र भाऊ आहेत. अहानाच्या लग्नात हे दोघे हजेरी लावतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र दोघेही लग्नात आणि रिसेप्शन पार्टीत दिसले नाहीत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला वरातीची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा वैभव कशी वाजतगाजत वरात घेऊन अहानाला घ्यायला पोहोचला होता..