आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hema Malini Happy To Ahana’S Marriage, Opened Many Secrets Of The Heart

मुलगी अहानाच्या लग्नामुळे खूप आनंदी आहेत हेमा, सांगितली कशी सुरु आहे लग्नाची तयारी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ड्रीम गर्ल हेमामालिनी यांची धाकटी कन्या अहाना देओल 2 फेब्रुवारी रोजी बोहल्यावर चढणार आहे. शुक्रवारी हेमामालिनी यांच्या जुहूस्थित बंगल्यात मेंदीचा कार्यक्रम पार पडला. हेमा या लग्नामुळे खूप आनंदात आहेत. खरं तर हेमा यांना स्वतःचे लग्नही अशाच थाटात करायचे होते. मात्र तसे होऊ शकले नाही. त्यामुळे ईशानंतर आता अहानाच्या लग्नात त्यांना कोणतीही कसर शिल्लक ठेवायची नाहीये. हेमाचे दुसरे जावई दिल्लीतील व्यावसायिक आहेत. वैभव वोरा हे अहानाच्या भावी पतीचे नाव आहे. वैभव पंजाबी कुटुंबातील आहे.
हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले होते. अहानाच्या मेंदी कार्यक्रमाच्या दिवशी हेमा म्हणाल्या, ''माझे लग्न घाईगडबडीत झाले होते. थाटात लग्न करायला आम्हाला वेळ मिळाला नव्हता. मात्र आता माझ्या घरी असे लग्न होत आहे, जिथे पंजाबी व-हाडाचं तामिळ पद्धतीने स्वागत होणार आहे. हा सर्व विचार करुन मी खूप उत्साहित झाले आहे.''
हेमा यांनी अहानाच्या लग्नाच्या निमित्ताने आपल्या मनातील बरीच रहस्य उघड केली. काय म्हणाल्या हेमा आणि कशा पद्धतीने होणारये अहानाचे लग्न जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...