आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Is How Madhuri Dixit Prepared Herself For Gulaab Gang

\'गुलाब गँग\'च्या स्टंट्सच्या प्रॅक्टिसमध्ये माधुरीने गाळला घाम, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिचा 'गुलाब गँग' हा आगामी सिनेमा रिलीज होण्याची प्रतिक्षा करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि सिनेमा 7 मार्चला रिलीज होणार आहे. माधुरीने या सिनेमासाठी खूप कष्ट घेतले आहे आणि ट्रेनिंगसुध्दा घेतली आहे. माधुरीला सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत.
या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये माधुरीला काही स्टंट्स करताना दाखवण्यात आले आहे आणि ती त्यात खूपच प्रभावी दिसत आहे. माधुरीला हे स्टंट्स कनिष्का शर्माने शिकवले आहे. अलीकडेच, माधुरीचे स्टंट्स करताना काही छायाचित्रे माध्यामांसमोर आले आहेत.
माधुरीच्या कष्टाविषयी कनिष्का सांगते, 'दिग्दर्शक सौमिक सेन यांनी मला सांगितले आहे, माधुरीकडून प्रभावी आणि वास्तविक स्टंट्स करून घ्यायचे आहे. मी माधुरीला मार्शल आर्ट शिकवले आणि ती यांचे उदाहरण सिनेमात देईल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा स्टंट्सची प्रॅक्टिस करताना माधुरीची छायाचित्रे...