आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Is The Reason, Why Big B Not Celebrted Holi

जाणून घ्या बिग बींनी का साजरा केला नाही होळीचा सण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रंगांचा सण होळी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटीजनी आपल्या चाहत्यांना व मित्रपरिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महानायक अमिताभ बच्चन ट्विटरवर चाहत्यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, होळी सणानिमित्ताने मी चाहत्यांना येणारी वर्षे ही अधिक रंगीबेरंगी, आनंदी व हर्षोल्लासाची जावो, आपले जीवन आनंद उत्साहाने भरून जावो, असेही म्हटले आहे. तथापि, गतवर्षीच्या काही कडवट क्षणांमुळे आपण यंदा होळीचा उत्सव साजरा करणार नसून, त्याऐवजी काही काळ मुलगी श्वेताबरोबर व्यतित करणार आहे. कारण, त्या दिवशी श्वेताचा वाढदिवस असून, आम्ही तिच्यासमवेत असलो पाहिजे. त्यामुळेच होळी आपण साजरी करणार नसून, कुटुंबात काही कडू-गोड घटना घडल्याने कुटुंब काहीसे दु:खात आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बी टाऊनच्या आणखी कोणकोणत्या कलाकारांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा...