आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषी कपूरपासून ते इम्तियाज अलीपर्यंत, बघा 'हायवे'च्या स्क्रिनिंगमध्ये कोणते स्टार्स झाले सहभागी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणदीप हुड्डा आणि आलिया भट्ट यांचा हायवे सिनेमा आज (21 फेब्रुवारी) रिलीज झाला. इम्तियाज अली दिग्दर्शित हा सिनेमा गेल्या ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे.
या चर्चेचे कारण म्हणजे इम्तियाज अली यांचे दिग्दर्शन. जब वुई मेट, रॉकस्टार, लव आज कल हे सिनेमे दिग्दर्शित करणा-या इम्तियाज अली यांच्या नावावरच तरुणाई सिनेमा बघायला जात असते. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे या सिनेमाला ए.आर. रहमान यांनी संगीत दिलंय. ऑस्कर विजेते रहमान यांचे या सिनेमाचे संगीत बरेच लोकप्रिय झाले आहे. याशिवाय रणदीप हुड्डा आणि आलिया भट्ट हे वेगळे कॉम्बिनेशनसुद्धा सिनेमात बघायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. शिवाय सलग दोन-तीन दिवसांपासून सिनेमाचे स्क्रिनिंगही आयोजित करण्यात येत आहे. बुधवारी आलियाच्या कुटुंबीयांसाठी स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. तर गुरुवारी मुंबईतील लाइटबॉक्समध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी हायवेचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
या स्क्रिनिंगला आलिया भट्ट, इम्तियाज अली, राजकुमार हिरानी, ऋषी कपूर, नीतू सिंह, शेखर कपूर, कबीर खान आणि गायत्रीसह बरेच सेलेब्स आले होते. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला हायवेच्या या स्पेशल स्क्रिनिंगची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा यावेळी आलेल्या स्टार्सची खास झलक...