आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलियाच्या कुटुंबीयांनी बघितला 'हायवे', बघा स्पेशल स्क्रिनिंगचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा आगामी 'हायवे' हा सिनेमा येत्या 21 फेब्रुवारीला रिलीज होतोय. या सिनेमात रणदीप हुड्डा आणि आलिया भट्ट मेन लीडमध्ये आहेत. इम्तियाज अलींचे दिग्दर्शन आणि ए. आर. रहमान यांचे संगीत या सिनेमाचे खास आकर्षण आहे. सिनेमातील काही गाणी रिलीजपूर्वीच गाजत आहेत.
सध्या सिनेमाची स्टारकास्ट प्रमोशनवर भर देताना दिसत आहे. बुधवारी रात्री या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. मुंबईतील पीव्हीआरमध्ये आयोजित या स्क्रिनिंगला आलियाचे वडील महेश भट्ट, आई सोनी राजदान, बहीण पूजा भट्ट यांच्यासह तिचे काका मुकेश भट्ट, त्यांचा मुलगा विशेष भट्ट आणि मुलगी साक्षी भट्ट हजर होते.
आलियाचे काका मुकेश भट्ट प्रसिद्द निर्माते असून त्यांचा मुलगा विशेष भट्ट दिग्दर्शक आहे. तर तिची आई सोनी राजदान अभिनेत्री असून मंडी, सडक, मॉन्सून वेडिंग, पेज थ्री या सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'हायवे'च्या स्क्रिनिंगची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आपल्या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी किती आनंदात होती आलिया...