आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Himmatwala Sells TV Rights For Rs. 40 Crore Before Film Release

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलीजपूर्वीच 'हिम्मतवाला' चर्चेत, 40 कोटींना विकले गेले हक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला आणि यूटीव्ही मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला 'हिम्मतवाला' हा सिनेमा रिलीजपूर्वीच चर्चेत आला आहे. या सिनेमाचे हक्क वाहिन्यांना 40 कोटींमध्ये विकले गेले आहेत.

एवढ्या मोठ्या किंमतीत टेलिव्हिजन हक्क विकल्या गेलेला हा अजयचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाचे हक्क पाच वाहिनींना विकण्यात आले आहेत. यामध्ये झी वाहिनीला एका निश्चित वेळेत हा सिनेमा प्रसारित करण्याचा हक्क देण्यात आला आहे. तर यूटीव्ही मुव्हीजला पाहिजे तितक्या वेळेत हा सिनेमा दाखवण्याची आणि इतर वाहिन्यांना सिनेमा प्रसारित करण्याचे हक्क विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आत्तापर्यंत अजय देवगणच्या सिनेमांचे हक्क एवढ्या जास्त किंमतीत विकले गेले नव्हते. अजयच्या मागील सिनेमांकडे एक नजर टाकली असता,
बोल बच्चन (2011) चे हक्क 28 कोटी
सिंघम (2012) चे हक्क 30 कोटी आणि
सन ऑफ सरदार या सिनेमाचे हक्क जवळपास 33 कोटींमध्ये विकले गेले होते.

अजय देवगण आणि तमन्ना भाटियाची प्रमुख भूमिका असलेला 'हिम्मतवाला' हा सिनेमा 1983 साली रिलीज झालेला आणि जितेंद्र-श्रीदेवी स्टारर 'हिम्मतवाला' या सिनेमाचा हा रिमेक आहे. हा सिनेमा येत्या 29 मार्चला रिलीज होणार आहे.

अजय देवगणच्या मते, हा सिनेमा सुपरहिट होईल आणि चांगला बिझनेस करेल. चला तर अजयची ही अपेक्षा पूर्ण व्हावी अशी आपण आशा करुया.