आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Ran Case: Where Does Go Eye Witness Of Salaman Khan ?

HIT AND RUN :सलमान खानविरूध्‍द साक्ष देणा-या रवींद्र पाटीलचा गेला नाहक बळी ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिट अँड रन प्रकरणी बुधवारी सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला मोठा झटका दिला. सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा निश्चित करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाला वेगळे वळण देणारी कोणती व्यक्ती आहे का ? तर याचे उत्तर हो असे आहे. ती व्यक्ती म्हणजे पोलिस शिपाई रवींद्र पाटील. पाटील हा एकमेव हिट अँड रन प्रकरणाचा साक्षीदार होता. अनेक वेळा त्याला न्यायायलाने साक्ष देण्यासाठी बोलवले होते, पण त्याने हजेरी लावली नव्हती. सतत वाढत जाणा-या दबावामुळे तो नैराश्‍यामध्‍ये गेला होता. मात्र न्यायालयात अनुपस्थित राहून आपण न्यायालयाचे अवमान करत असल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने सत्र न्यायालयासमोर हजेरी लावली होती. मात्र नंतर तो पुन्हा गायबच झाला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याच्याविरूध्‍द अटक वॉरंट काढले. पाटील न्यायालयात साक्षीसाठी का उपस्‍थित राहत नाही याची शहानिशा होणे आवश्‍यक होते.

पुढे पाहा सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाचा एकमेव साक्षीदार रवींद्र पाटीलचे काय झाले..