आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HIT AND RUN CASE : सलमान खान मोकळाच, सुनावणी आता 29 एप्रिलला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिट अँड रन प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान मोकळाच आहे. आज (सोमवार) या प्रकरणावर सुनावणी होती. मात्र या सुनावणीला सलमान खान गैरहजर होता. आता सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली असून पुढील सुनावणी येत्या 29 एप्रिल रोजी होणार आहे. वांद्रे कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात केलेल्या अपीलावर ही सुनावणी होणार होती. मात्र, आज न्यायाधीश गैरहजर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

सलमान खानवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश वांद्रे न्यायदंडाधिका-यांनी दिले होते. त्या विरोधात सलमानने अपील केले होते. न्यायालायाने समन्स न बजावल्याने सलमान सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमीच होती.

2002 साली सलमानच्या गाडीने एका जणाला चिरडले होते. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेला तब्बल साडे दहा वर्षांचा कालावधी लोटला असला तरीदेखील अद्यापही हा खटला सुरुच आहे.