आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HIT AND RUN: सलमान आरोपीच्या पिंजर्‍यात, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिट अँड रन प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला कोर्टाने झटका दिला आहे. सेशन कोर्टाने आज (बुधवार) सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केला आहे. मात्र सलमानने स्वतःला निर्दोष असल्याचे कोर्टात म्हटले आहे. याप्रकरणाची पुढची सुनावणी आता 19 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सेशन कोर्टाने सलमानवर आरोप निश्चित केले असून त्याच्यावर भां.द.वि कलमानुसार 304 (2), 379, 337, 338, 427 आणि 134 (ए) (बी) आणि मोटार यान अधिनियमचे कलम 66 बी अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. या कलमांनुसार सलमानला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.
सेशन कोर्टात बुधवारी (24 जुलै) सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर न्यायाधिशांनी त्यांची बदली झाल्याचे सांगत ही सुनावणी करण्यास नकार दिला आणि म्हटले, की नवीन न्यायाधिशांची नियुक्ती झाल्यानंतर ते आरोप निश्चित करतील. मात्र जेव्हा सलमानच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले, की सलमान पुढील एक-दोन महिने सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने भारताबाहेर जाणार आहे. तेव्हा न्यायाधिशांनी आरोप निश्चित केले. कारण एखाद्या आरोपीवर आरोप निश्तिच होत असताना तो कोर्टात हजर असणे आवश्यक असतं. जर बुधवारी आरोप निश्चित झाले नसते आणि सलमान परदेशात गेला असता तर त्याच्यावर आरोप निश्चित होण्यास आणखी उशीर झाला असता. शिवाय त्याचे कोर्टात हजर राहणेही अवघड झाले असते.
तसे पाहता कोर्टाने सलमानला पुढील सुनावणीलाला गैरहजर राहण्याची आणि परदेशात जाण्याचीही परवानगी दिली. मात्र आवश्यकता भासल्यास सलमानला कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
बुधवारी सकाळी अकरा वाजता कोर्टात दाखल झाला. यावेळी त्याच्यासोबत त्याच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता होत्या. यावेळी सलमान खूपच नर्व्हस दिसत होता आणि कोर्टात पोहोचेपर्यंत तो कुणाशीही बोलला नाही.