आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Run Case: Salman Khan To Appear In Court Today

HIT AND RUN CASE: आज होणार सलमानची सुनावणी, होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात आज (24 जुलै) आरोप निश्चित केले जाणार आहे. सलमान कोर्टाच्या सुनावणीसाठी आपल्या घरुन रवाना झाला आहे. आजच्या सुनावणीत सलमान दोषी आढळ्यास त्याला 10 वर्षांचा कारावास होऊ शकतो.
सलमानबाबत कोर्टासमोर दोन पर्याय आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे खटला नव्याने चालवावा अथवा सध्याच्या खटल्यावर निकाल द्यावा. कोर्ट यापैकी कोणता पर्याय निवडते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, 24 जून रोजी वांद्रे न्यायदंडाधिका-यांनी सलमानची पुनर्विचार याचिका रद्द करत त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले होते. त्या विरोधात सलमानने अपील केले होते.
सन 2002 मध्ये सलमानच्या गाडीने एका जणाला चिरडले होते. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.