आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Run Case: Salman Khan To Appear In Court Today

सलमानवर लागले आहेत बॉलिवूडचे 450 कोटी, बघा कोर्टात जातानाची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिट अँड रन प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला कोर्टाने झटका दिला आहे. सेशन कोर्टाने बुधवारी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केला आहे. मात्र सलमानने स्वतःला निर्दोष असल्याचे कोर्टात म्हटले आहे. याप्रकरणाची पुढची सुनावणी आता 19 ऑगस्ट रोजी होणार आहे.

सेशन कोर्टाने सलमानवर आरोप निश्चित केले असून त्याच्यावर भां.द.वि कलमानुसार 304 (2), 379, 337, 338, 427 आणि 134 (ए) (बी) आणि मोटार यान अधिनियमचे कलम 66 बी अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. या कलमांनुसार सलमानला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.

सुनावणी दरम्यान अर्पिता आणि अलविरा या सलमानच्या बहिणी त्याच्यासोबत होत्या. जेव्हा सलमानला निर्णय सुनावण्यात आला, तेव्हा त्याने आधी वर आणि नंतर आपल्या दोन्ही बहिणींकडे बघितले. कोर्टाच्या निर्णयामुळे अर्पिता आणि अलविरा यांना धक्का बसला आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, आरोप निश्चित झाल्यानंतर सलमान विटनेस बॉक्समधून लगेचच बाहेर आणि वेळ न दवडता आपल्या वकिलांची भेट घेतली. सलमानने आपल्या दोन्ही बहिणींना मिठी मारली आणि त्यानंतर काही फोन नंबर डायल केले.

गेली दहा वर्षं गाजत असलेल्या वांद्र्यातील 'हिट अँड रन' प्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिका-यांनी काही महिन्यांपूर्वी सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून हा खटला सेशन्स कोर्टाकडे वर्ग केला होता. परंतु, या प्रकरणी आपण निरपराध असल्याचा आव आणत सलमानने हा गुन्हा मागे घेण्याबाबत याचिका दाखल केली होती. ती सेशन्स कोर्टाने जूनमध्ये फेटाळली आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कायम ठेवला.

सलमानला याप्रकरणी शिक्षा झाल्यास बॉलिवूडला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. त्याच्या तीन प्रोजेक्टसवर बॉलिवूडचे तब्बल साडे चारशे कोटी लागले आहेत. 'किक' या सिनेमावर 150 कोटी, 'बिग बॉस'वर 50 कोटी आणि 'मेंटल' या सिनेमावर 200 कोटी लागले आहेत.

बघा सुनावणीसाठी कोर्टाकडे जातानाची सलमानची छायाचित्रे...