आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood & Bollywood Couples Get Romantic At Beach

फक्त रणबीर-कतरिनाच नव्हे, या सेलिब्रिटींनीही केलाय BEACHवर रोमान्स, बघा झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कतरिना कैफ आणि रणबीर कपूर सध्या हॉलीडे एन्जॉय करण्यात मग्न आहेत. स्पेनमध्ये सुटीचा पुरेपुर आनंद लुटल्यानंतर हे दोघे अलीकडेच श्रीलंकेतील एका बीचवर दिसले. त्यामुळे या दोघांच्या रोमान्सचे किस्से सगळीकडे रंगत आहेत. हे दोघे लवकरच लग्नाचीही घोषणा करतील, असेही बोलले जात आहे. कतरिनाचे रणबीरच्या कुटुंबीयांबरोबर खूप चांगले जुळू लागले आहे. कारण जेव्हा रणबीर कपूर 'ये जवानी है दिवानी' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने लंडनला गेला होता, तेव्हा कतरिनासुद्धा तिथे पोहोचली होती आणि तिने रणबीर आणि नीतू सिंग यांच्याबरोबर एकत्र डिनर केला होता.
इकडे रणबीर कतरिनाचा रोमान्स सातव्या आसमानावर असताना सलमानसुद्धा त्याची नवी गर्लफ्रेंड लुलिया वेंचरबरोबर वेळ घालवताना दिसला.
एकंदरीतच रणबीर-कतरिना आणि सलमान-लुलिया या लव्ह बर्ड्सच्या रोमान्सला चांगलाच रंग चढला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून रणबीर आणि कतरिनाप्रमाणे बीचवर रोमान्स करणा-या बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींविषयी सांगतोय...
यापैकी काही सेलिब्रिटींनी सिल्व्हर स्क्रिनवर तर काहींनी आपल्या खासगी आयुष्यात बीचवर रोमान्स केला आहे...